जळगाव । शहरातील भोईटे नगरात राहणार्या एक इसमाच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकीच्या काचा अज्ञात व्यक्तीने सोमवारी दुपारी फोडल्या. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भोईटे नगरात असलेल्या गुरुपार्कमध्ये सुनील रमेश जाधव हे राहतात. सोमवारी दुपारी त्यांनी त्यांची चारचाकी क्रमांक एमएच.19.बीयू.8905 घराजवळ उभी केली होती. दुपारी 3 ते 4 दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चारचाकीची मागील काच फोडली. जाधव यांचे 9 हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.