उभ्या चारचाकीवर रीक्षा आदळली ; अनोळखी महिला प्रवाशाचा मृत्यू

0

भडगाव- शहरातील संजय महाजन यांच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या चारचाकी (एम.एच.19 बी.यु.3317) वर भरधाव अ‍ॅपे रीक्षा (एम.एच.41 सी.3072) आदळून झालेल्या अपघातात अनोळखी महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. अ‍ॅपे रीक्षा चालक संजय भास्कर बोरसे (भडगाव) विरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक रवींद्र जाधव करीत आहेत.