उमजाई देवी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

0

शहादा तालुक्यातील 17 कि मी अंतरावर सातपुड्याच्या पायथ्यांशी बसलेल्या जावदे त बो येथील उमजाई देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून कार्तिकी पोर्णिमेच्या पाडव्याच्या दिवशी डोंगर दर्‍यांतूल भाविक मोठ्या उत्साहात हजेरी लावून उमजाई देवीचे दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण करतात. या याञेची ग्रामपंचायतीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली . या उमजाई देवीच्या यात्रेला शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी पंरपरा असुन आजही कायम सुरू आहे.

पूर्व पिठिका
शंभर सव्वाशे वषार्ंपूर्वी उमजाई देवी माता गावातील दगडु नथ्यु पाटील ,रावजी नंदा भील व महारु गिरासे या तिघांना एकाच रात्री स्वप्नात आकाशवाणी झाली की, गावाच्या उत्तरेस निंबाच्या झाडाखाली मी ओडणी, बांगड्या त्रिाशुल आदी अलंकार ठेवले आहेत. या ठिकाणी एकाच रात्री तापीचे पाणी,वाळू आणून मंदिर बांधून माझी स्थापना करावी.असा दृष्टांत उमजाई देवीने दिला. सदर तिघांनी स्वप्नात दिलेल्या दृष्ट्रांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तर त्या ठिकाणी देवीने सांगितलेले अलंकार मिळून आले. त्या तिघांनी देवीची स्थापना केली. दगडु नथ्यु पाटील यांनी ब्रिटिश कालिन मामलेदाराच्या पत्नीला सहा किलो सोन्याची दागिने देऊन मामलेदाराकडून जावदे गावात यात्रा भरविण्याची परवानगी मिळवून घेतली. यानंतर या तिघांनी गावोगावी दवंडी देऊन प्रचार – प्रसार केला. स्वप्नात दृष्ट्रात दिलेल्या दिवशी म्हणजे कार्तिकी पोर्णिमेच्या दिवशी यात्रा भरविण्यास सुरूवात केली. मात्र , याच दिवशी गावात एक जण मयत झाल्याने कार्तिकी दिवशी यात्रा न भरता पाडव्याच्या दिवशी यात्रा मोठ्या उत्साहात भरत असते. कोणी तरी दगावल्याची गावात ही परंपरा आजही गावात कायम आहे. मातेचे मंदिर अद्याप बांधले गेले नाही. उघड्यावर माते ओडणी, त्रिाशुल, बांगड्या अंलकार असून भाविक याच अलंकाराची पूजा अर्चना व नवस फेड करीत असतात. या शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी पासून सुरू असलेल्या याञेची इतिहासात कुठेही नोंद आढळून येत नाही . माञ गावातील वयोवृद्धांकडुन ही दंत कथा आजही कायला मिळते. 2005 रोजी ग्रास्थांनी गंगा, यमुना, गोदावरी , तापी क्रुष्णा ,नर्मदा या पाच नद्यांचे पाणी व वाळू एकञ करून एकाच राञीतुन उमजाई देवी मातेचा ओटा बांधून सावलीसाठी शेड उभारण्यात असला.

यात्रेची पूर्वतयारी
या उमजाई देवीची यात्रा पोर्णिमेच्या पाडव्याच्या दिवशी सुरू होत असले तरी यात्रेसाठी व्यापारी व व्यवसायिक चार पाच दिवस अगोदरच आपली दुकाने थाटण्यास सुरूवात करित असतात. सातपुड्याच्या पायथ्यावरील डोंगर दर्‍यातील व गुजरात मध्यप्रदेश व नंदुरबार जिल्ह्यातील हजारो भाविक व व्यवसायिक या यात्रेला महत्त्व देतात. ही यात्रा भांडी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. भांडी विक्रेते यात्रा होऊनही चार पाच दिवस थांबत असतात. सातपुडयाच्या परिसरात उमजाई देवी यात्रा जागृत देवस्थान असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर नवस फेडण्यासाठी गर्दी होत असते.

मनोरंजनाची साधने
या यात्रेत मनोरंजनाची विविध साधने येत असतात. कटलरी दुकाने, हॉटेल्स, मोठ मोठे झुले पालखी दाखल होत असल्यामुळे लहानमुले आनंद लुटत असतात. तरुण – तरूणींना फॅशनच्या तकलादु पंरतु आकर्षक वस्तू झुलावत असतात. म्हणून. मोठ्या प्रमाणात फॅशन वस्तूची विक्री होत असते. रात्री मनोरंजनासाठी भिका – भिमा , रघुविर खेडकर या सारखे अनेक नामवंत तमाशे आवार्जुन येतात. या याञेत भाविकांची व व्यवसायिकांची गरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत चे सरपंच कन्हैया हेमराज पवार, उपसरपंच आनंदसिंग गिरासे, ग्रामसेवक भटुलाल बच्छाव व ग्रामपंचायत सदस्य याञेकरुना चांगली सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याञेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसावद पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी तळ ठोकून आहेत लया याञेत खास करून आदिवासींच्या लोकन्रुत्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. म्हणून आदिवासी बांधव गाव दिवाळी पाहण्यासाठी दुर दुरहुन येतात.

-बापू घोडराज, शहादा
9860118151