उमर्दे येथे महिलांचा दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीला वेढा

0

नंदुरबार । तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे गावात दारू बंदी करावी या मागणीसाठी बुधवारी महिलांनी ग्रामपंचयतीला वेढा टाकला व गांव दारू मुक्त झालेच पाहिजे अशी मागणी केली. पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांची भेट घेवुन निवेदन देण्यात आले. गावात जागो जागी दारूची दुकाने आहेत. दोन ते अडीच हजार लोकवस्तीच्या गावात जवळ जवळ 15 दारुची दुकाने आहेत. दारुच्या व्यसनपायी अनेक महिलांना कुटुंब चालवतांना समस्या निर्माण होतात. अनेकांना घर चालवणे कठीण होते. दारुच्या व्यासनपायी दिवसभर घाम गाळून पैसा घरापर्यंत येत नसल्याने कौटुंबिक जीवन विस्कळीत होत आहेत.

तरूणपिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने उद्ध्वस्त
गावातील युवा पीढ़ी या दारुच्या व्यसनपायी रोजगार, व्यवसाय सोडून दारुच्या नादी लागून त्यांचे आयुष्य व्यसनाधीन होत चालले असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. कुटुंबात कोणीही व्यक्ति दारुच्या आहारी गेल्यास त्याचा त्रास शेवटी महिलांनाच सोसावा लागतो. यामुळे महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले. पोलिस प्रशासन गोपनीय तक्रारी लक्षात घेत नसल्याने ग्रामपंचयतीने सयुक्त ठराव मंजूर करण्याची मागणी केली. यात सर्व समाजाच्या महिलांनी सहभाग राहिला. पोलीस अधिकार्‍यांना देखील निवेदन देण्यात आले.