जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य निवडून देण्यासाठी आज 29 मे रोजी झालेल्या निवडणूकीत विद्या परिषदेतून प्रा.प्रिती अग्रवाल व प्रा.जितेंद्र नाईक हे दोन सदस्य निवडून आले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली. महिला संवर्गातून व्यवस्थापन परिषदेवर एक सदस्य निवडून द्यावयाचा होता. त्यासाठी प्रा.प्रिती अग्रवाल (जळगाव) व प्रा.शुभांगी राठी (भुसावळ) या निवडणूक रिंगणात होत्या. आजच्या बौठकीत झालेल्या मतदानात प्रा.प्रिती अग्रवाल यांना 36 तर प्रा.शुभांगी राठी यांना 20 मते प्राप्त झाली. प्रा.प्रिती अग्रवाल या विजयी झाल्या. 57 पौकी 56 मते वौध ठरली तर एक मत अवौध ठरले. प्रा.अग्रवाल या जी.एच.रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ बिझीनेस अॅण्ड मॅनेजमेंटच्या संचालक आहेत.
जीएसटी प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रारंभ
शिक्षकांमधून निवडून द्यावयाच्या जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यापौकी प्रा.जितेंद्र नाईक (उमवि) हे 35 मते प्राप्त करुन विजयी ठरले. प्रा.त्र्यंबक पाटील (धुळे) यांना 21 तर प्रा.पुष्पा गावीत (धुळे) यांना एकही मत प्राप्त झाले नाही. एकूण 57 पौकी 56 मते वौध ठरली तर एक मत अवौध ठरले. प्रा.नाईक हे विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक आहेत. विद्यापीठातील बहिस्थ विभाग हा आयडीयल बहिस्थ विभाग या नावाने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच या विभागामार्फत प्रमाणपत्र ते पदव्युत्तर पदवी स्तरावरील शिक्षणक्रम अंमलबजावणीसाठी शुल्क संरचनेला मान्यता देण्यात आली. विद्यापीठाच्या पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी या बौठकीत समिती स्थापन करण्याला मान्यता देण्यात आली. आजच्या बौठकीत विद्यापीठाने गुडस् अॅण्ड सुव्हस टॅक्स (जीएसटी) हा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गंगाधर पानतावणे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बैठकीत सदस्यांच्या शंकांचे निरसन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील व प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी केले. कुलसचिव भ.भा.पाटील यांनी सुत्रसंचालन केले.