उमवित संशोधनपर लेखांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

0

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रातर्फे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सादर झालेल्या संशोधनपर लेखांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते सोमवार 4 जून रोजी झाले. स्त्री अभ्यासकेंद्राच्या वतीने जानेवारी 2012 मध्ये ‘महिलांविरूध्द हिंसा: कायदा व सुरक्षा’ या विषयावर राष्ट्रीय परिषद झाली होती. तसेच फेब्रुवारी 2015 मध्ये ‘स्त्रिया व माध्यमे’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही परिषदांमध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचे भाषण तसेच परिषदेत सादर झालेले शोधनिबंध संपादित करून पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी स्त्री अभ्यासकेंद्राच्या माजी विभागप्रमुख प्रा.शोभा शिंदे, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.प्रिती अग्रवाल, स्त्री अभ्यास केंद्राच्या विभागप्रमुख प्रा.मधुलिका सोनवणे, प्रशांत पब्लिकेशन्सचे प्रदीप पाटील उपस्थित होते. या पुस्तकाचे संपादन प्रा.शोभा शिंदे यांनी केले आहे.