उमविला बहिणाबाई चौधरी यांच्या नावाची मागणी

0

चाळीसगाव । खान्देशच्या साहित्यीक विश्‍वात एक मानाचे नाव म्हणून बहिणाबाई चौधरी यांचे नाव घेतले जाते. बहिणाबाईंनी साध्या व सोप्या बोलीभाषेतून सामान्य माणसाचे दु:ख, वेदना मांडल्या. बहिणाबाईंच्या स्मृती व साहित्य समाजमनात जिवंत तर आहेच मात्र ते अधिक वृद्धिंगत व्हावे व त्यांच्या कार्याचा योग्य गौरव व्हावा यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ‘लोककवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ असे नामकरण करावे अशी मागणी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात याविषयी जनजागृती करुन लढा उभारण्याचा निर्धार व्हीबीव्हीपीने केल्याची माहिती प्रवक्ते पंकज रणदिवे यांनी दिली. निवेदनावर तुषार सुर्यवंशी, ऋषीकेश पाटील, योगेश तायडे, संदीप रायपूरे, शुभम वाघ, धनंजय मोरे आदी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.