उमवि सिनेट निवडणुकीसाठी युवासेनेची बैठक

0

जळगाव । उमविच्या सिनेट निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर युवासेनेची जिल्हा बैठक घेण्यात आली. विद्यापीठाच्या निवडणूक दरम्यान उपाय योजना करण्यासाठी जिल्ह्याभरातील आढावा पदाधिकार्‍यानी नेत्यान पुढे मांडला संपर्क प्रमुख रविद्र मिर्लेकर यांनी संयुक्त पणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील,युवसेना जिल्हाप्रमुख प्रीतेश ठाकूर,विवेक पाटील,शिवराज पाटील,महानगरप्रमुख सुनील ठाकूर,विनायक सागर,गणेश साळुंखे,स्वप्नील जावळे,प्रशांत सोनवणे,शंतनू नारखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवडणुकीचा बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील सक्रीय तसेच विद्यार्थी संघटनाच्या वतीने सिनेट सदस्य पदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. या निवडणुका विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने बिनविरोध करण्याचा प्रयत्न असणार आहे. येणार्‍या निवडणुका उत्सुकतेच्या ठरणार त्या निम्मिताने राजकीय व विद्यार्थी संघटनाच्या वतीने मोर्चे बांधणी करण्यात येत आहे. यामाध्यमातून अनेक युवा नेते देखील सक्रीय होण्याची शक्यता आहे.