जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे नेट-सेट परीक्षेच्या पूर्व तयारीच्या मार्गदर्शनासाठी 2 ते 5 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात आजपासून 11 ते 5 या वेळेत कार्यशाळा होणार असून कार्यशाळेस प्रा.कमलाकर पायस (अमरावती), डॉ.दिगंबर खोब्रागडे (भुसावळ), डॉ.मंगला हिरवाडे (नागपूर), डॉ.भारत कराड (उमवि) हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते होणार असून समारोपाला बी.सी.यु.डी.संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक केले आहे. परिक्षेचे महत्व लक्षात घेवून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.