उमवीला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या ठरावाचे अभिनंदन

0

जळगाव-बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्याचा ठराव नुकताच नागपूर अधिवेशनात मंजूर करण्यात आला. त्यामुळे या निर्णयाला पाठींबा देणाऱ्या विधानसभेच्या कौतुकाचा आणि अभिनंदनाचा ठराव आज विद्यापीठातील पीएचडीच्या पूर्व अभ्यासक्रमाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी ठराव मांडत अनुमोदन दिले. पूर्व पीएचडीच्या अभ्यासक्रमाचा कार्यक्रम 16 जुलै पासून सुरू झाला आहे. त्यात हा पहिलावहिला ठराव करण्यात आला.