उमाळा जलशुद्धीकरण केंद्रास तज्ज्ञांची भेट

0

जळगाव । गेल्या दोन महिन्यांपासून शहरात दुर्गंधीयुक्त व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी स्थायी समिती सभेत प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, एमजेपीच्या तज्ञांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी पाण्याचे नमूने घेतले असून लवकरच आयुक्तांना अहवाल देण्यात येणार आहे.

गेल्या दोन महिन्यापासून पिवळयापाणीचा पुरवठा
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका होण्याची शक्यता आहे. साने गुरुजी कॉलनीतील काही नागरिकांनी मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांच्या घरी जावून दुषित पाण्याचे नमूने दाखविले होते. त्यानंतर अनंत जोशी व भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. यावर आयुक्तांनी एमजेपीच्या तज्ञांकडून पाहणी करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर अनंत जोशी यांनी स्वत: जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्यात. त्यानंतर एमजेपीचे अधिकारी श्री.सरोदे, श्री.बेंडाळे, श्री.मनियार या तीन अधिकार्यांनी भेट देवून पाहणी केली. दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचे नमूने तपासणीसाठी घेतले असून लवकरच त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले.