उमेदवार आणि मतदारांच्या संभ्रमात कौल अस्पष्ट

0

नेते अन् उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावावर ठरणार निकाल
जळगाव । महापालिका निवडणूक आता अवघ्या एक दिवसावर येवून ठेपली आहे. आणखी 36 तासात सगळ्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल. यंदाची निवडणूक पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह, सहानुभूतिची लाट अथवा सत्ताधार्‍यांबद्दलचा रोष, भ्रष्टाचार किंवा विकासाचे दावे यापेक्षा निवडणुकीत उतरलेल्या नेत्यांचे वैयक्तिक हेवे-दावे, त्यांचा प्रभाव, त्यांची प्रतिमा व जनसंपर्क यावरच अधिक बेतलेली दिसली. त्यातच नव्या वार्ड रचनेमुळे आणि एकाच वार्डात चार-चार उमेदवार असल्याने विकासकामांचा हिशेब देण्याची सक्ती उरली नाही. वार्डांच्या सीमारेषा स्पष्ट नसल्याने यापुढेही मतदारांना विकासाचा जवाब देतांना निवडून आलेले नगरसेवक सहज एकमेकांच्या नावावर टोलवा-टोलवी करू शकणार आहेत. उमेदवारांची ही अवस्था असताना मतदार तर आणखीच संभ्रमित आहेत.

निवडणूक ऐन भरात असतानाही कुठल्याही मोठ्या नेत्याचा स्पष्ट प्रभाव दिसून आला नाही. तसेच काही मोजके लोक वगळता उमेदवारही मतदारांना आकर्षित करू शकले नाहीत. त्यामुळे उद्या होणार्‍या मतदानात मतदार नेमका किती उत्साह दाखवतात व कुणाला कौल देतात? हा मोठा संशोधनाचा विषय असेल. त्यातच भर म्हणून यावेळी निवडणूक प्रचाराला वेळही कमी मिळाल्याने अन काटेकोर हिशेबाचे बंधन असल्याने ही निवडणूक अगदी मिळमिळीत झाली. मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, म.न.पा. आयुक्त चंद्रकांत डांगे व जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी वेळोवेळी नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान रविवारी म.न.पा. व रोटरी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने मतदानाबाबत जनजागृतीसाठी ‘वोटर्स रन’चे आयोजनही करण्यात आले होते. शहरात ठिकठिकाणी मतदान करण्याबाबतचे होर्डींगही लागले आहेत. तसेच शहरातील काही उमेदवारांनी बाहेरगावी असलेल्रा आपल्रा वार्डातील मतदारांना मतदानासाठी बोलावतांना चक्क लक्झरी बसच्रा तिकीटाचीही व्रवस्था केली असल्राचे कळते. तरीही यासगळ्यांचा नेमका किती प्रभाव पडेल? याबाबत शंकाच आहे.

नव्या मतदारांचा उत्साह आणि प्रभाव…
यावेळी शहरात नव्याने नोंदणी झालेल्या मतदारात 20 वर्षांखालिल मतदारांची संख्या 6531 एवढी असून त्यात 3929 युवक तर 2602 युवती आहेत. यांचे हे पहिलेच मतदान असल्याने त्यांच्यात उत्साह असण्याची शक्यता आहे. असे असले तरी या वयोगटाच्या मतदारांना आकर्षित करू शकतील असे मुद्देच चर्चेत नसल्याने हा वर्ग निकालावर फारसा प्रभाव टाकण्याची शक्यता कमीच असेल. वार्डावार्डातील नेहमीच्रा मतदान केंद्रांमध्रेही रावेळी बदल झाल्राने नागरिकांना मतदानासाठी बर्‍राच लांबपर्रंत रेण्राजाण्राची व केंद्र शोधण्राची कसरत करावी लागणार आहे. त्रामुळेही मतदानाच्रा उत्साहावर परिणाम होण्राची शक्रता नाकारता रेत नाही.

एम पॉवरच निर्णायक ठरणार?…
एकिकडे सभा आणि रॅलींमध्ये विकास कामांचे दावे-प्रतिदावे केले जात असताना आणि जाहिरनाम्यांमधून विकासाच्या वल्गना केल्या जात असताना दुसरीकडे जाणत्या उमेदवारांनी आपल्या पारंपरीक मार्गाची जय्यत तयारी करून ठेवल्याची चर्चा आहे. त्याचे पडसाद कालपासून उमटू लागले आहेत. निवडणूक जसजशी जवळ येवू लागलीय तसा दर वधारत चालल्याची स्थिती आहे. काल सायंकाळी शहरातील एका संवेदनशिल भागात पैसे वाटपावरून दोन गटात हाणामारीची घडलेली घटना याचे चांगले उदाहरण आहे. आज सायंकाळपर्यंत मतदारांचा भाव वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.

दिग्गजांची उदासिनता आणि मतभेद…
या निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची फाटाफूट अन मतभेद प्रकर्षाने दिसून आलेत. माजीमंत्री एकनाथराव खडसे व गुलाबराव देवकर हे किनार्‍या किनार्‍यानेच पोहले, त्यांनी पूर्ण उडी घेतलीच नाही. माजीमंत्री सुरेशदादा जैन जोशात असले तरी नेहमीप्रमाणे प्रभाव पाडण्यात कमी पडले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उत्साहात होते पण ते ही प्रचारात एकरूप झालेले दिसले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनाची चढाओढ यावेळी दिसून आली नाही.