नंदुरबार: लोकसभा निवडणुक लढवीत असलेले भाजपचे उमेदवार डॉ.हिना गावीत यांनी शहरातील डी.आर.हायस्कूलच्या मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार के.सी.पाडवी यांनी धडगाव तालुक्यातील असली या गावातील मतदान केंद्रावर मतदान केले. नंदुरबारमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत २८.११ टक्के मतदान झाले होते.