‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’चा आलेख वाढताच; दहा चित्रपटांच्या यादीत स्थान !

0

मुंबई-पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित विकी कौशल स्टारर ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळविली. प्रदर्शित होऊन तीन महिने उलटूनही अद्याप हा चित्रपट सुरु आहे. तीन महिन्यानंतरही या चित्रपटाची जादू बॉलिवूडवर आणि चाहत्यांवर कायम आहे. पहिल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या ‘उरी…’च्या कमाईचा आकडा सलग तिसऱ्या महिन्यानंतर २४४. ०६ कोटींवर पोहोचला आहे. सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ‘उरी’ने स्थान मिळवले आहे. ‘उरी’ शिवाय ‘बाहुबली’ (हिंदी) या चित्रपटाचाही समावेश आहे. तर त्यामागोमाग अनुक्रमे ‘दंगल’, ‘संजू’, ‘पीके’, ‘टायगर जिंदा है’, ‘बजरंगी भाईजान’, ‘पद्मावत’, ‘सुल्तान’ आणि ‘धूम’ अशा चित्रपटांचा समावेश आहे.