पिंपरी : दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा जवळ आली असून,विद्यार्थ्यांचा माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक काळ संपला. पुढील परीक्षा देऊन महाविद्यालयीन शिक्षण सुरु होईल विद्यालयातील शेवटचा दिवस म्हणून विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत करत शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका उत्तरा कांबळे, केंद्र प्रमुख देशमुख सर, सलाम इनामदार सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्या दिल्या.
उच्च शिक्षण घेऊन देशसेवा करावी
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी प्रमुख उपस्थित विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षे संदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की, मुस्लिम समाजातील बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहतात. दहावी पूर्ण झाल्यावर कामधंदा करून गुजारा करतात. उच्च शिक्षण घेणे बंद करतात यामुळे विकास करणे अवघड ठरते यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने उराशी स्वप्न बाळगून उच्च शिक्षण घेत मोठ्या पदावर जावं व देश हिताचं कार्य करावे. पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्ट आणि रयत विद्यार्थी विचार मंच पुढील काळात महाविद्यालयीन शिक्षणासाठी शासनाकडे पाठपुरावा करून अकरावी व बारावीसाठी महाविद्यालयाची निर्मिती करेल असे स्पष्ट केले. यावेळी मुख्याध्यापिका उत्तरा कांबळे ,केंद्र प्रमुख देशमुख सर, सलाम इनामदार सर, अझहर शेख सर व शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.