चाळीसगाव। शहरातील घाट रोड वरील अँग्लो उर्दू हायस्कुलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार, सट्टा सुरु असून त्या ठिकाणी दारू व गांज्याची देखील विक्री होते यामुळे शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांवर शैक्षणिक परिणाम होत असल्याने परिसरातील अवैध धंदे लवकर बंद करावे अन्यथा शाळेचा पालक वर्ग व परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला असून तशा आशयाचा निवेदन 14 जून 2017 रोजी शहर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
शाळेच्या परिसरातच जुगार, सट्टा सुरु
शहरातील घाट रोड नागद रोडवरील अल्पसंख्यांक समाजाचे अँग्लो उर्दू हायस्कुल आहे. त्यात अल्पसंख्यांक समाजाचे विद्यार्थी 5 ते 10 व्या वर्गात शिकतात त्याच प्रमाणे नगरपालिकेची पहिली ते चौथी पर्यंतची शाळा देखील आहे. या शाळेच्या परिसरात जुगार, सट्टा सुरु असून दारू गांजाचा धंदा खुले आम सुरु आहे. त्याच प्रमाणे काही लोक दारू पिऊन रस्त्यावर व शाळेच्या ग्राउंडवर येऊन भांडण करून शिवीगाळ करतात त्यामुळे शाळेतील लहान मोठे विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याचा त्रास होऊन त्यांचे शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. परिसरात सट्टा, जुगार खेळण्याच्या नावाखाली लोक एकत्र येऊन गांजा व दारूची विक्री करतात या लोकांवर कुणाचाही धाक नसल्याने त्याचा त्रास वाढत चालला आहे. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता दारुळे शिवीगाळ व मारहाण करतात त्या मुले विद्यार्थी घाबरून परिसरात भीतीचे वातावरण तयार होत आहे. तरी हायस्कुल च्या परिसरातील अवैध धंदे त्वरित बंद करावे. अन्यथा शाळेचा पालक वर्ग व परिसरातील नागरिक या विरोधात जन आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
निवेदनाच्या प्रति गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव, मुख्यध्यापक अँग्लो उर्दू हायस्कुल चाळीसगाव, अध्यक्ष मुस्लिम पंच कमेटी चाळीसगाव यांना देण्यात आले. निवेदनावर नगरसेवक चिरागोद्दीन शेख रफिक खाटीक, इम्रान शेख, हाजी मंजूर, कैसर खाटीक, अरिफ सय्यद, निहाल शेख रशीद, अयुबखान रसूल खान, सय्यद हुसेन, लुकमान शाह, शेख रफिक शौकत भाई यांच्या स्वाक्षर्या आहेत.