उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश

0

निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर अँग्लो उर्दू हायस्कूलची इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड करण्यात आली. विज्ञान तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग धुळे यांच्या विद्यमाने धूळे, जळगांव नंदुरबार या तीन जिल्ह्यस्तरावर छत्रपती शिवाजी हायस्कूल धूळे येथे झालेल्या इनसपार अवार्ड विज्ञान प्रदर्शनात अँग्लो उर्दु हायस्कूल निजामपुर या शाळेचा शेख अवैस साजिद या विद्यार्थ्यांच्या अँक्सिडंट प्रूफ कार व मॉडर्न कार पार्कींग या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली.

इतर विद्यार्थ्यांचाही सहभाग
या प्रकल्पासाठी विज्ञान शिक्षक माजीदशेख कुरेशी यांनी मार्गदर्शन केले होते. त्याच बरोबर या प्रदर्शनात शेख मुबशिर सलीम याने स्मोक फिल्टर व शेख अजीम खालीद या विद्यार्थ्यांनी स्काँय बस हे उपक्रण सादर केले होते. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान शिक्षक मुकतार खान व कुरेशी माजीद पठाण साजीदखान या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते. या निवडीबद्दल संस्थाचे मुखाधयापाक मन्यार नासिर मुबिन खान, अध्यक्ष तांबोळी उस्मान शेख, सचिव हाजी मियाबेग मिरजा, उपाध्यक्ष शब्बिरखान व संचालक शहाबोदीनशेख आदी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.