पिंपरी-चिंचवड : निगडीकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून परत वळविण्यात आली आहे. दापोडी येथील चौकात वाहतूक खोळंबली आहे. तसेच उर्से टोलनाका येथे एक्सप्रेस-वेवरील एक लेन अडविण्यात आली आहे.
अचानक आलेल्या दोनशे ते तीनशे भीमसैनिकांनी टोल नाक्यावर ठिय्या मांडून टोल नाका बंद केला. त्यामुळे अगोदरच द्रुतगती महामार्गावर तुरळक असलेली वाहतूक अचानक ठप्प झाली. अति आवश्यक असेल तरच नागरिकांनी प्रवास करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.