उसनवारीच्या पैशांच्या वादातून हाणामारी

0

जळगाव। उसनवारीचे पैसे मागितल्याचे वाईट वाटून दोघांनी एकाचा लाठ्या-काठ्यांनी बदेम मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास शिरसोली येथे घडली. याप्रकरणी तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. शिरसोली येथील रहिवासी जितेंद्र लक्ष्मण बारी (वय-27) हा गवंडी काम करतो. याने पिंजारी याला उसनवारीने पैसे दिले होते.

एक ते दिड वर्ष उलटून देखील उसनवारीने दिलेले पैसे मिळत नसल्याने त्यांनी अल्ताफ लिब्बास पिंजारी व अमजद लिब्बास पिंजारी यांच्याकडे पैसे देण्याची मागणी केली. मात्र, दोघांनी उसनवारीचे पैसे मागितल्याचा राग येवून इंदिरा नगर परिसरात जितेंद्र बारी यांना बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास लाठ्या-काठ्यांनी तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली. यानंतर रात्रीच जितेंद्र याला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीसांनी जितेंद्र याचे जबाब नोंदवून अल्ताफ लिब्बास पिंजारी व अमजद लिब्बास पिंजारी या दोघा भावांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अल्ताब लिब्बास पिंजारी याने देखील जितू अटवाल व देविदास प्रकाश पाटील यांच्याविरूध्द फिर्याद दिली आहे.