Knife attack on one in Bhusawal over Usanwari’s money भुसावळ : शहरात एकावर चाकूने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
उसनवारीच्या पैशातून वाद
शहरातील रजा टॉवर चौकाजवळील तीन नंबरच्या शाळेजवळ मदिना मांडा दुकानासमोर उसनवारीच्या घेतलेल्या पैश्यावरून वाद होऊन वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. शाकीर शहा मगदुम शहा (रा. पापानगर, भुसावळ) यांच्या भावाने घेतलेल्या उधारीच्या पैश्याची मागणी केली. यावरून वाद झाले.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा
शिविगाळ करीत संशयीत सलमान उर्फ टँकर गफूर शेख (रा. पापा नगर, भुसावळ) याने शहा यांच्या भावाला शिवीगाळ करून चाकूने हाताच्या पंजावर व दंडाला शिवीगाळ करून दुखापत केली. या प्रकरणी शाकीर शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार अर्चना अहिरे पुढील तपास करीत आहे.