जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशनचे सहकार्य
नंदुरबार । क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धांचे आयोजन बादशाह नगरमधील ऊर्दू हायस्कुल येथे करण्यात आले होते. यास्पर्धेचे अध्यक्ष तथा उद्घाटक के.आर.पब्लिक स्कुलचे संचालक सिद्धार्थ किशोरभाई वाणी हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लायनेस क्लबच्या अध्यक्षा प्रा.ज्योती महंत, खजिनदार अर्चना चव्हाण, अॅड.समिरा मॅडम, नवापूर तालुका क्रीडा संयोजक राजेंद्र साळुंखे, मुख्याध्यापक आर.आर.शेख आदी उपस्थित होते.
यावेळी सिद्धार्थ वाणी म्हणाले की, तायक्वांदो स्पर्धा अतिशय सुंदर असून ती मला फारच आवडली. या स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा करतो. महंत मॅडम यांनी मुलींचे चित्तथरारक प्रात्यक्षिक बघून मुलींचे कौतुक केले आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून जावेद बागवान, अमन राज, फैझल खाटीक, जुनेद मलिक, सलमान शेख आदींनी काम पाहीले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अक्षय तडवी, सुफीयान काझी आदींनी परिश्रम घेलते.