शिक्रापूर । शिरूर तालुक्यात असणारे घोडगंगा व व्यंकटेश साखर कारखाना तसेच शेजारील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखाना या तीन मोठ्या गाळप असलेल्या साखर कारखान्यांना ऊसाची वाहतूक शिक्रापूर या मध्यवर्ती ठिकाणाहून होत असल्याने येथे वाहतूक कोंडीबरोबर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे कारखाना प्रशासन आणि आरटीओ डोळेझाक करीत असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणार्या नागरिकांचे जीव धोक्यात आला आहे.
ऊसाचा हंगाम सुरू झाला असल्यामुळे शिक्रापूर परिसरात अनेक ट्रॅक्टर ट्रॉलीतून धोकादायक अशी ऊसाची वाहतूक केली जाते. चालकाच्या चुकीमुळे अथवा वाहनाच्या बिघाडामुळे तसेच प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरल्यामुळे वाहने उलटण्याचे प्रमाण वाढत आहे. ओव्हरलोड ऊस वाहतूक करणार्या वाहनाला रिफ्लेक्टर बसवण्यात यावे, तसेच ऊस वाहतूक करणार्या वाहनावरील चालकाचे वाहन परवाना तपासण्याची मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी
केली आहे.