‘ऊस उत्पादकांना मार्गदर्शनाची गरज’

0

सणसवाडी । जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरज आहे. शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या सबल झाला पाहिजे, असे मत अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी सणसवाडी येथे व्यक्त केले. सणसवाडीच्या खंडोबा आळीतील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी पलांडे यांची नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनावणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

माजी उपसरपंच बाबासो दरेकर, महादेव वाखारे, अशोक हरगुडे, मोहन हरगुडे, रमेश पलांडे, अशोक दरेकर तसेच ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व आभार विद्याधर दरेकर यांनी मानले.