भुसावळ- शहरातील पालिकेच्या हुडको भागातील रहिवासी असलेल्या प्रीती ओंकार बांगर (22) या तरुणीने आपल्याशी प्रेमसंबंध ठेवावेत तसेच लग्न करण्यासाठी संशयीत आरोपी प्रवीण विष्णू इंगळे (27, राहुल नगर, भुसावळ) याने गळ घातली होती मात्र तरुणीच्या कुटुंबियांनी त्यास विरोध केल्याने आरोपी रविवार, 14 एप्रिल रोजी तरुणीवर चाकूचे तब्बल 14 वार करून तिचा निर्घूण खून केला होता. खुनानंतर आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपीची कोठडी संपल्याने त्यास गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीस सायंकाळी जळगाव जिल्हा कारागृहात हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी करीत आहेत.