अमरावती : एकतर्फी प्रेमामुळे तरुणाने भरदिवसा तरुणीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. या प्रकरणी अक्षय पुरुषोत्तम कडू या आरोपीला खोलापुरी गेट पोलिसांनी अटक केली आहे.
१९ वर्षीय तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी तरुणी व आरोपी अक्षय हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून, आरोपी हा या तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता.