एकतास येथे दोन माकडांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0

अमळनेर।  तालुक्यातील एकतास येथील गावात आलेल्या दोन माकडांना विजेचा धक्का लागल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यांच्यावर हिंदूधर्म संस्कृती नुसार अंतसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील एकतास येथे 21 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन माकड यातील एक नर व एक मादी हे गावात वावरत असतांना त्यांना अचानक विजेचा शॉक लागल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला. गावातील तरुणांना हि घटना समजल्यावर त्यांनी दोघ माकडांना उचलुन वाचविण्याचा प्रयत्न केला पण ते जागीच त्याच्या मृत्यू झाला होता. दोघी माकडांचा मृत्यू झाला अशी खात्री युवकांना झाल्याने त्यांनी दोघे शव उचलून श्रीराम मंदिरात नेले.

दशक्रिया विधी 30 जून रोजी
माकडांचे शव नेल्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थ जमत दोघाही माकडांचा हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. त्यानंतर ग्रामस्थानीं रात्रभर जागरण करत राम मंदिरात भजन व रामधून लावली. दुसर्‍या दिवशी 22 रोजी सकाळी ग्रामस्थांनी बॅन्ड लाऊन व हिंदू परंपरेनुसार चार खांडेकरी व एक मडके धरून श्रीराम मंदिरातून दोघांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गावातील पुरुष, महिला व परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. गावातील ग्रामस्थ व तरुणांनी त्या दोघांचा दशक्रिया विधी व गंधमुक्तीच्या कार्यक्रम शुक्रवार 30 जून रोजी सकाळी गावातील श्रीराम मंदिराजवळ करण्याचे ठरविले आहे.