एकनाथी भागवत महोत्सवात संतांचा गौरव

0

फैजपूर : गुरुवर्य नथुसिंग महाराज राजपूत जन्मशताब्दी वर्ष व वारकरी शिक्षण संस्था आळंदी शताब्दी वर्ष व वै. डिगंबर महाराज वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त बस स्टॅन्डसमोरील भव्य मैदानावर श्री एकनाथी भागवत पारायण व नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात वारकरी सांप्रदायाचे प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे व विशेषत्वाने खान्देशमध्ये ज्यांनी समाज जागृतीचे कार्य केले त्यामध्ये वै. झेंडूजी महाराज बेळीकर परंपरेचे राजाराम शास्त्री महाराज, वै. नथुसिंग महाराज दौरा मंडळाचे प्रसाद महाराज अमळनेरकर व चैतन्य महाराज देगलूकर यांना महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन, कथाकथनकार प्रा. व पु. होले व नंदू पाटील यांनी केले. कार्यक्रमास महंत भरतदास महाराज कुसुंबा, हभप पंढरीनाथ महाराज आरु, बळीराम महाराज, माधव महाराज मोरे, जेडीसीसी बँक संचालक गणेश नेहेतेे, पंचायत समिती सभापती लिलाधर चौधरी, अरुण पाटील, पुरुषोत्तम पाटील, रामनाथ पाटील यांसह जिल्हाभरातून मान्यवर, साधुसंतांसह हजारो भाविक उपस्थित होते.