एकलव्य जिम्नॅस्टिक्स संघास राज्य स्पर्धेत १४ पदके

0

८ रजत व ६ कांस्य पदकांची कमाई
जळगाव – के.सी.ई. सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अॅकॅडमीमध्ये सराव करणारे ११ खेळाडूंनी जालना येथे झालेल्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य स्पर्धेत सहभागी झाले होते. हि स्पर्धा नॅशनल डेव्हलपमेंट, सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनीअर अशा चार गटात झाली. यात एकलव्य जिम्नॅस्टिक्स अॅकॅडमीच्या खेळाडूंनी १४ पदके पटकावली. यात ८ रजत व ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.

खालील खेळाडूंनी मिळविले यश
नॅशनल डेव्हलपमेंट:
उत्कर्ष सोनार (कांस्यपदक: पुरुष एकेरी)
यशराज देशमुख (रजतपदक: पुरुष एकेरी)
अनुष्का चौधरी व उत्कर्ष सोनार (कांस्यपदक: मिश्र दुहेरी)
अनुष्का चौधरी, साची इंगळे व उत्कर्ष सोनार (रजतपदक: मिश्र तिहेरी)

सब ज्युनिअर:
वेदोसी वाणी (रजतपदक: महिला एकेरी)
पाणिनी देव व अनुष्का जगताप (कांस्यपदक: मिश्र दुहेरी)
रागिणी चोपडे, श्रावणी कदम व श्रेया पाटील (रजतपदक: मिश्र तिहेरी)

ज्युनिअर:
भूषण देशमुख (कांस्यपदक: पुरुष एकेरी)
या संघासोबत आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तथा राष्ट्रीय पंच प्रा. निलेश जोशी व राज्यस्तरीय मार्गदर्शक प्रा. प्रविण कोल्हे यांनी जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, रणजीत पाटील, धर्मेश चतुर्वेदी, नितीन चौधरी यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.