केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत
हे देखील वाचा
मुंबई :- शिवसेनेने स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळविण्याची घोषणा केली असली तरी त्यांना ते स्वबळावर एकट्याला एकाकी लढून शक्य होणार नाही. त्यासाठी शिवसेनेला रिपब्लिकन पक्ष आणि भाजप सोबत महायुती करावी लागेल. युती मध्ये ज्या पक्षाचे आमदार अधिक निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकेल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकित महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी आरपीआय भाजप सोबत शिवसेनेने महायुती केली पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा केली होती त्यावर प्रतिक्रिया देताना आठवलेंनी उद्धव ठाकरेंचा स्वबळावर मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा दावा पूर्ण होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. ते मुत्सद्दी नेते आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबतची युती तोडता कामा नये. महाराष्ट्रावर शिवसेनेची सत्ता स्थापण्यासाठी त्यांना एकट्याने लढून उपयोग होणार नसून त्यासाठी महायुती केली पाहिजे. भाजप आरपीआय आणि शिवसेनेची महायुती होणे देशहिताचे आहे.या महायुती मध्ये जर शिवसेनेचे आमदार जास्त आले तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो असे आठवले यांनी स्पष्ट केले.