एकाची गळफास घेऊन आत्महत्त्या

0

जळगाव । शहरातील गुड्डूराजा नगरमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. जितेंद्रसिंग गब्बरसिंग रावत असे इसमाचे नाव आहे. गळफास घेऊन आत्महत्त्या केली. जितेंद्रसिंग याच्याकडे स्वत:ची ट्रक होती व या संदर्भातच तो व्यवसाय करीत होता. शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

गेल्या 12 वर्षोपासून जितेंद्रसिंग हा मानसिकदृष्टया अस्थिर होता व त्याच्यावर डॉ.प्रदीप जोशी, डॉ. दुसाने, डॉ. सतीष पाटील यांचेमार्फत उपचार सुरू होते. गेल्यावर्षी त्यास अकोला येथील डॉ. केळकर यांच्याकडेही दाखल करण्यात आले होते. मध्यंतरी त्याने औषधी नियमित न घेतल्यामुळे त्यास पुन्हा हा आजार बळावला. या आजारादरम्यान तो जीव देण्याच्या धमक्या घरातील सदस्यांना देत होता, असे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.