चाळीसगाव । शहरातील हरिगीर बाबा नगर पाटणादेवी रोड येथे राहते घरी गळफास घेतल्याने 59 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना 30 मे 2017 रोजी दुपारी 3:30 वाजेपूर्वी उघडकीस आली असून चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी शहरातील पाटणादेवी रोड हरिगिरी बाबा नगरातील रहिवासी व चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाली कामगार प्रकाश भागा आगोने (59) यांचा मृतदेह आज दि 30 मे 2017 रोजी दुपारी 3:20 वाजेच्या सुमारास त्यांचे राहते घरी घराच्या छताच्या पाईप ला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांचे नातेवाईक साईनाथ नथू देवरे यांनी त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहे.