मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्या स्तराला पोहोचतील हे सांगणे अवघड आहे. सलमाला एकदा भेटण्यासाठी त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपी शेराला अटक केली आहे.
त्याला भेटण्यासाठी त्याचे चाहते त्याच्या ‘गॅलक्सी’ या बंगल्याबाहेर रात्रंदिवस रांगा लावून बसतात. सलमानचा असाच एक चाहता त्याला भेटायला ‘गॅलक्सी’बाहेर बसला होता. मात्र, त्याची आणि सलमानची भेट झाली नाही.
माहितीनुसार, सलमानची भेट न झाल्यामुळे हा चाहता प्रचंड उद्विग्न झाला. त्याने त्याच्या कर्माचाऱ्याला फोन केला. सलमानशी बोलू दिले नाही, तर मी त्याचा जीव घेईन, अशी धमकी त्याने दिली. याविरोधात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमधून शेराला अटक केली आहे.