नवी दिल्ली- में महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ११ लाखापर्यंत यात घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.दरम्यान गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली असली तरी पीएफ जमा करणाऱ्या कंपनीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच अर्थ असा काही कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा केलेला नाही. म्हणजे डिफॉल्ट करणाऱ्या कंपनीच्या संख्येत वाढ झाली आहे असे दिसून येते.
६२ हजार पेक्षा अधिक कंपनी डिफॉल्ट
एप्रिलमध्ये ४,६१,०६,५६८ इतकी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या होती ती में मध्ये ५,, ५०,५८,०५६ इतकी झाली. एका महिन्यात ११ लाख सदस्य कमी झाले आहे. ताज्या आकडेवारीनुसार ६२ हजार ८०६ कंपनी डिफाल्ट करीत आहे म्हणजे कर्मचाऱ्यांचे पीएफ नियमीत जमा करीत नाही.