नवी दिल्ली- शेजारी राष्ट्र पाकिस्तान भारताच्या कुरापती काढतच आहे. पाकिस्तानकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवणे साफ चुकीचे आहे. एका सर्जिकल स्ट्राइकने त्यांना अक्कल आली नाही असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एका सर्जिकल स्ट्राइकचे संकेत दिले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले आहेत.
पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत, दहशतवादी हल्ले थांबले नाहीत तर आम्हाला आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करावाच लागेल असे संकेत मोदींनी दिले आहेत.
एकीकडे पाकिस्तानची चर्चेची भाषा होते आणि दुसरीकडे भारतावर दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवणं हे चुकीचं ठरेल त्यांना एका लढाईने अक्कल आली असे अजिबात वाटत नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.