नवी दिल्ली- यूके येथील ऑनलाइन मार्केट रिसर्च आणि डेटा एनालिटिक्स फर्म यूगोने एक सर्वेक्षण केले आहे. ज्यात भारतातील प्रभावशाली व्यक्तीचा समावेश आहे. २०१८ च्या सर्वेक्षणात बॉलीवूड, क्रीडा क्षेत्रातील ६० नामांकित व्यक्तीचा यात सर्वे करण्यात आला आहे. यूगोच्या या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. महेंद्रसिंग धोनी यांनी माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर आणि विद्यमान कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.
या यादीत तिसऱ्या स्थानी धोनी आहेत. चौथ्या स्थानी सचिन तेंडूलकर असून सहाव्या स्थानी विराट आहे. या यादीत पहिल्यांदाच ऑलंम्पिक पदक विजेती खेळाडू पी.व्ही.सिंधूचा समावेश झाला आहे. ती १५ व्या स्थानी आहे.