एक्झिट पोलच्या अंदाजाने शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण !

0

मुंबई-पाच राज्यातील निवडणुकीनंतर भाजपा सरकारच्या विरोधात एक्झिट पोलचा अंदाज गेल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स सकाळी ४७८.५९ अंकानी घसरुन ३५,२०४.६६ वर सुरु झाला. तर निफ्टीमध्येही १८५ अंकाची घसरण झाली. निफ्टीची १०,५०८.७० अंकावर सुरुवात झाली. सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी सेन्सेक्स ५७९ अंकानी घसरून ३५,०९३ वर तर निफ्टीमध्ये १७७ अंकाची घसरण होत १०,५१६ अंकावर गडगडला.

एक्जिट पोलमध्ये राजस्थानमध्ये भाजपाकडून सत्ता जाईल तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसबरोबर अटीतटीची लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तीन राज्यांबरोबरच तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होईल. एक्झिट पोल आल्यानंतर शेअर बाजाराने दिवसभर चांगली कामगिरी केली होती. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स ३६१ अंकांच्या तेजीसह ३५,६७३ वर तर निफ्टी ९२ अंकाच्या तेजीसह १०,६९३ वर बंद झाला होता.