एक्सप्रेसमध्ये अवैध दारू जप्त

0

जळगाव प्रतिनिधी । धावत्या एक्सप्रेसमध्ये अवैध दारू जप्त करण्यात आल्याचे वृत्त असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जळगाव स्थानकावर नवजीवन एक्सप्रेस आली असतांना पोलीस पथकाने यातून अवैध दारू जप्त केली आहे. यात नेमका किती माल जप्त करण्यात आला याची माहिती मिळाली नसली तरी सुमारे एक लाखांपेक्षा जास्त मूल्याचा माल जप्त केल्याची माहिती आहे. जीआरपी, आरपीएफ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही संयुक्त कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू केले आहे.