एक कोटींच्या बिटकॉइनच्या परस्पर विक्री प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

0

निगडी : एक कोटी रुपये किमतीच्या बीटकॉइनची मालकाला कोणतीही पूर्वसूचना अथवा संमती घेतल्याशिवाय परस्पर विक्री करण्यात आल्या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भीमसेन बाबुराम आगरवाल (वय 65, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, रुपेश सिंग, हेमंत चव्हाण, काका रावडे, हेमंत सुर्यवंशी या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2016 मध्ये वरील सहा आरोपींनी फिर्यादी भीमसेन आगरवाल यांना एक कोटी रुपयांचे बिटकॉइन घेण्यास भाग पाडले. त्यानंतर भीमसेन यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या बिटकॉइनची परस्पर ऑनलाइन विक्री केली. ही बाब लक्षात येताच भीमसेन आगरवाल यांनी निगडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे करीत आहेत.