एक दिवसाच्या नवजात शिशूला फेकले झाडाझुडुपात

0
पिंपरी-चिंचवड : अवघ्या एका दिवसाच्या नकोशा झालेल्या स्त्री जातीच्या शिशूला जन्मदात्यांनी झाडाझुडपात फेकून दिले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 26) सायंकाळी चारच्या सुमारास जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरात उघडकीस आली. या शिशुला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी येथील क्षितिज कॉलनी येथील झुडपातून नवजात शिशुच्या रडण्याचा आवाज नागरिकांनी ऐकला. त्याठिकाणी जाऊन पहिले असता एका दिवसाची नवजात मुलगी रडत असल्याचे दिसले. नागरिकांनी वाकड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले. तिला उपचारासाठी औंध शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.