सांगवी : एक पुस्तक विद्यार्थ्यांच्या भविष्याला कलाटणी देऊ शकते. त्यामुळे विद्यार्थांनी खूप वाचन केले पाहिजे. तेव्हा तुम्हाला मराठी भाषेचे महत्व कळेल, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्या मंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशु विहार, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदरबाई भानसिंग, हूजा गुरु गोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्रीबाई फुले दत्तक पालक अर्थ वितरण व वर्ग उदघाटन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. ही शाळा गेली चौदा वर्ष हा उपक्रम राबवत असुन आजपर्यंत शाळेने 15 लाख रुपयांची मदत विद्यार्थांना केली आहे. यावर्षी शाळेने 260 मुला-मुलींना प्रत्येकी 1000 प्रमाणे 26,0000 रु.चे वाटप करत आहे, ही खरोखर अभिमानाची बाब आहे.
मिळालेल्या संधीचा सोन करा
हे देखील वाचा
टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर आशिष कदम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना मूल्यांशी तडजोड करू नका. स्वतःचे महत्व ओळखा. तुलना करू नका आणि मिळालेल्या संधीचा सोन करा. तुम्हीही उद्याचे भारताचे नागरिक आहात. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या निवृत्त शिक्षिका राजश्री जाधव यांनी दिलेल्या देणगीतून केलेल्या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे होते. याप्रसंगी महाराष्ट्र धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कूचेकर, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, माजी नगरसेवक संतोष बारणे, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश साठे, खजिनदार रामभाऊ खोडदे, सचिव परशुराम मालुसरे, जयवंत आढाव, तुळशीराम नवले, रवींद्र कोकाटे, भाऊसाहेब जाधव, रत्नमाला दुधभाते, सातारा मंडळाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, खजिनदार सोमनाथ कोरे, अशोक भोसले सविता माने, सुमन कारखानीस व तनिष्का ग्रुप सांगवीच्या महिला सदस्या आदी उपस्थित होते. प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी केले. सूत्रसंचलन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.