‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चा बॉक्स ऑफिसवर संथ प्रवास

0

मुंबई-सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला यांची भूमिका असलेल्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले. पहिल्या दिवशी फार कमाई झालेली नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ ३ कोटी ३० लाख रूपयांची कमाई केली. मात्र दुस-या दिवशी काल कमाईचा आकडा वाढत ४.६५ कोटींवर पोहोचला. आज रविवारी या कमाईत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट समलैंगिक नात्यावर आधारित आहे. अनिल कपूर व सोनम कपूर या रिअल बाप-लेकीच्या जोडीने या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केले आहे.

सुमारे १५०० स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली आहे. एक नवा आणि तितकाच बोल्ड विषय मांडणा-या या चित्रपटाकडून सर्वांनाच अपेक्षा होत्या. पण पहिल्या दिवशीची कमाई बघता, या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. अर्थात डिजिटल व सॅटेलाईटचे हक्क विकून या चित्रपटाने आधीच २४ ते २५ कोटी कमावले आहेत. त्यामुळे ३५ कोटी रूपयांचा बजेट असलेल्या या चित्रपटाला फार नुकसान सोसावे लागणार नाही. मेट्रो सिटीत चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण यादरम्यान ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ समोर ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या दोन चित्रपटांचे आव्हान आहे.