मुंबई- अनिल कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार राव यांचा आगामी चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेलर रिलीज झाला होता. दाम्र्यान आज या चित्रपटाचे पहिले गाणे टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे.
९० च्या दशकात आलेल्या अनिल कपूर यांच्याच ‘१९४७ ए लव स्टोरी’ या चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. याच गाण्याच्या मुखड्यावर आधारित शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे टायटल ट्रॅक आहे. या संपूर्ण गाण्यात राजकुमार राव सोनमच्या प्रेमात बेभान झाला आहे तर सोनमच्या मनात दुसरेच काही सुरु आहे.
रोचक कोहली आणि दर्शन रावेल यांनी हे गाणे गायले आहे. गुरप्रीत सैनीने या गाण्याला शब्दबद्ध केले. ओरिजनली हे गाणे आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते आणि जावेद अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते.
या ट्रेलरवरून हा चित्रपटाची कथा समलैंगिक नात्यावर आधारित असल्याचे समजते. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि सोनम कपूर ही बापलेकीची जोडी पहिल्यांदा ऑन स्क्रिन आहे. जुही चावलाही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. येत्या १ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. शैली चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी यांची निर्मिती आहे.