एक लाखांचा अवैध डिंक साठा जप्त

0

भुसावळ : यावल तालुक्यातील आडगाव येथून वनविभागाच्या फिरत्या गस्तीपथकाने सुमारे 340 किलो वजनाचा व एक लाख रुपये किंमतीचा अवैधरीत्या साठा करून ठेवलेला डिंक जप्त केला. या कारवाईने खळबळ उडाली. 19 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावल गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनरक्षक एस.एस.माळी, जगदीश ठाकरे, संदीप पाटील, योगीराज तेली आदींनी ही कारवाई केली.