एक लाखांसाठी विवाहितेचा छळ ; पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव : माहेरहून एक लाख रुपये न आणणार्‍या विवाहितेचा छळ सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावातील आरोपींविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या लता गणेश वंजारी यांचा विवाह रामेश्वर कॉलनीतील गणेश संजय लाडवंजारी यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती गणेश लाडवंजारी याने पैश्यांसाठी शिविगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर वडीलांकडून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली परंतु वडील पैसे देवून शकत नसल्याने सासरे, सासून दिर व दिरानी यांनी शारीरीक व मानसिक छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून बुधवारी 5 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती गणेश लाडवंजारी, सासरे संजय लाडवंजारी, सासू मनीषा संजय लाडवंजारी, दीर मुकुंदा संजय लाडवंजारी आणि दिरानी राणी मुकुंदा लाडवंजारी (सर्व रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गफ्फार तडवी करीत आहे.