सांगली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एक वेळ हिजड्याला मुले होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असे आम्हाला वाटले होते. मात्र भाजपा सरकारने सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असे वादग्रस्त वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. सांगलीत शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
सध्या गडकरी यांचे विधान चर्चेचे कारण बनले आहे. विजय मल्ल्या हा कर्जबुडव्या नाही असे विधान त्यांनी केले होते त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.