एचआयव्ही बाधीत मुलांसमवेत ख्रिसमस साजरा

0

मावळ : महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स व यश फौंडेशन, चाकण ता. खेड यांच्या वतीने 2016 पासून संपूर्ण खेड तालुक्यात एच.आय.व्ही/एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ख्रिसमस (नाताळ) सणाचे औचित्य साधून व नवीन वर्ष 2018 चे स्वागत करण्यासाठी संस्थेच्या चाकणस्थित कार्यालयात आयोजन केले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप बी.जाधव, महिंद्राचे ब्रिजेश परदेशी, उमेश बिबटे व यश फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते. यावेळी मुलांना चादरी आणि पोषण आहारचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलांनी सुंदर कविता, नाटिका व नृत्य सादर करून नाताळ व नवीन वर्ष स्वागत कार्यक्रम जल्लोषात साजरा केला.