एचए स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा विषयावर विविध स्पर्धा

0

पिंपरी : एच. ए. स्कूल प्राथमिक विभाग व पूर्व प्राथमिक विभागाचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानेच प्रादेशिक परिवहन मंडळातर्फे ‘रस्ता सुरक्षा’ या विषयावर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतशालेय चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य लेखन स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये परिसरातील 15 शाळांतील 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन वाहन निरीक्षक चंद्रकांत माने व माजी विद्यार्थी दिनानाथ जोशी यांच्या हस्ते झाले.

मुख्याध्यापिका कल्पना आगवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी रस्ता सुरक्षाचे आपल्या जीवनातील स्थान व महत्त्व मुलांना सांगितले व मुलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. माने यांनी आपल्या भाषणात सर्व मुलांना रहदीच्या जुन्या व नवीन नियमांची ओळख करून दिली व आपल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले. सविता पॉल यांनी आभार मानले.