पिंपरी ः एच. ए. स्कूल प्राथिमक विभागात उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. 2018-19 या शैक्षिणक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बालगीते व सनईच्या मंगलमय सुरात विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन झाले. मुलांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. शालेय परिसर फुगे, पताका, फुलांच्या माळा लावून सजिवण्यात आला होता. विद्येची आराध्य देवता सरस्वतीच्या पूजनाने कार्यक्रमास सुरवात झाली. इयत्ता 1 लीतील नवोदितांचे स्वागत ढोलच्या गजरात व शालेय लेखन साहित्य भेट देऊन, फुलांच्या वषार्वात करण्यात आला. सर्वशिक्षा अभियानांतगर्त इयश्ना 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना आगवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवीन शैक्षिणक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भरपूर अभ्यास करा, खेळा, कोणतेही काम मनापासून करा. म्हणजे तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहनाज हेब्बाळकर यांनी केले.