जळगाव। येथील गोदावरी इंजिनिअरिंगमधील मुलींच्या वसतीगृहात राहणारी 26 वर्षीय विद्यार्थीनीच्या पर्समधुन एटीएम कार्ड चोरुन स्टेट बँकेतून 24 हजार 500 रुपये चोरट्यांनी चोरुन नेली असून या संदर्भात विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत वैंवरराम हिंगणघाट वर्धा जिल्ह्यातील ह.मु. गोदावरी कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात राहणारी सारिका अंबदास एरंबरे हिच्याजवळ तिच्या मालकीची स्टेट बँकेचे एटीएम कार्ड होते.
यावेळी तिला पिनकोड लक्षात राहण्यासाठी तिने मार्कर पेनाने त्या एटीएम कार्डवर नंबर लिहून ठेवलेला होता. 16 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या सुमारास ती एकरा मेडिकल कॉलेज येथे असतांना तिच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने एटीएम कार्ड लंपास केले. 24 हजार 500 रुपयांची रक्कम घेवून चोरट्यांनी पोबारा केला. या संदर्भात अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलिस स्थानकात प्रमाणे सारिका एरंबरे हिच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ बाळकृष्ण पाटील करीत आहेत.