शिरपूर। शहरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे एटीएम कार्ड अज्ञात इसमाने अदलाबदल करून 39 हजार 500 रुपये काढून नेल्याची घटना घडली. 21 रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुल दयाराम पाटील रा.फत्तेपूर ता.जामनेर जि.जळगाव हल्ली मुलांच्या वसतीगृह शिरपूर हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्समधील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. पैसे काढल्यानंतर बाहेर पडत असतांना त्यावेळी एका अज्ञात इसमाने त्यास मोबाईलमधून मिनी स्टेटमन पाहण्याचा बहाणा केला. त्यावेळी त्या इसमाने एटीएम कार्डची अदलाबदल करून 39 हजार 500 रूपये काढून नेल्याची घटना घडली. अज्ञात इसमाविरूद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हिस्सेवाटणीवरून मारहाण
शेतीची हिस्से वाटणी बरोबर केली नाही त्याचा राग येवून पन्नालाल वालचंद माळी रा.पापड कारखाना गुजर खर्दे यास मारहाण करण्यात आल्याची घटना 19 रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. याबाबत संशयीत आरोपी युवराज वालचंद माळी, प्रकाश वालचंद माळी, पंकज हिरालाल माळी, जितेंद्र हिरालाल माळी, दिनेश युवराज माळी, गणेश युवराज माळी, कमलेश प्रकाश माळी, ज्योती प्रकाश माळी, सुनिता जितेंद्र माळी असे एकूण 9 जणांविरोधात भादंवि कलम 452, 143, 147, 148, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.